सायनाचं डेन्मार्क ओपनच्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं

0

डेन्मार्क, दि. 21 : भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालचं डेन्मार्क ओपनच्या विजेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. रविवारी झालेल्या महिला एकेरीत तैपईच्या ताइ त्झू यिंगने सायनाचा 13-21, 21-13, 6-21 असा पराभव केला.
सायना ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर दोन वर्षांनी हा सुपर सिरीज फायनलचा सामना खेळत होती. पण ताइने तिचा पुन्हा एकवार पराभव केला. सायनाने ताइ त्झूला 2013 मध्ये नमवले होते. पण त्यानंतर त्झू सायनाविरुद्धचा प्रत्येक सामना जिंकत आली आहे. गेल्या दहा लढतीत सायना ताइला हरवू शकलेली नाही. रविवारच्या सामन्यातही याचीच पुनरावृत्ती झाली.
सायनाने सर्व्हिसमध्ये चुकत सामन्याला सुरुवात केली. सुरुवातीलाच ताइने 4-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर ती 36 शॉट रॅलीनंतरही एक पॉइंट जिंकली. दबावाखाली आलेली सायना चुका करत होती. पहिल्या गेममध्ये ताइने 11-5 अशी लीड घेतली. ब्रेकनंतर पुढच्या 15 मिनिटांत ताइने 21-13 अशी आघाडी कायम ठेवली. दुसरा गेम 21-13नेच जिंकला तर तिसऱ्या गेममध्ये सायनाने ताइपुढे शरणागतीच पत्करली.

Share.

About Author

Leave A Reply