देशमुखांच्या घरी पोहोचले सीबीआयचे पथक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देशमुखांच्या घरी पोहोचले सीबीआयचे पथक

नागपूर,: गेल्या 2 महिन्यांपासून परांगदा असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आज, सोमवारी सकाळी सीबीआयचे पथक दाखल झाले. देशमुखाचा मुलगा सलील आणि सुनेच्या विरोधात सीबीआयने अटक वॉरंट बजावल्याची चर्चा आहे. परंतु, यासंदर्भात सीबीआय किंवा देशमुख कुटुंबियांपैकी कुणीही दुजोरा दिलेला नाही.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत. देशमुख यांना वारंवार समन्स बजावल्यानंतरही ते चौकशीसाठी हजर होत नसल्याने त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटिसही काढण्यात आली होती. त्यानंतर आयकर विभागानंही अनिल देशमुखांच्या घरावर धाड टाकली होती. आता सीबीआयचे पथक देशमुखांच्या घरी दाखल झाले आहेत.देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सकाळी 7 वाजता सीबीआयचे पथक दाखल झाले होते. सीबीआयचे पथक देशमुखांच्या नागपुरातील घरी पोहोचल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी देशमुखांच्या घरासमोर आंदोलन केले. तसंच, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीपण केली. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे वारंवार समन्स बजावल्यानंतरही चौकशीसाठी हजर होत नसल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशा विनंतीच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अर्जाची अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी दखल घेतली. न्यायालयाने देशमुख यांच्याविरोधात ‘प्रोसेस’ म्हणजेच कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.