'आई कुठे काय करते' मालिकेत येणार धमाकेदार वळण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

'आई कुठे काय करते' मालिकेत येणार धमाकेदार वळण

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'चं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहे. सध्या मालिकेत अनघा आणि अभिषेकच्या साखरपुड्याची धामधूम सुरु असताना संजनाच्या येण्याने आनंदात विरजण पडलं आहे. शुभकार्यात विघ्न आणण्याचा संजनाचा मनसुबा आहे. संजनाच्या या कारस्थानाविषयी कळताच अरुंधतीने माझ्या संसारात ढवळाढवळ केलीस मात्र माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही, असं म्हणत संजनाच्या कानशिलात लगावली आहे. 

अरुंधतीचं हे रौद्ररुप संजनासाठी नक्कीच धक्कादायक आहे. पण जेव्हा जेव्हा आपल्या मुलांच्या सुखाचा प्रश्न असतो तेव्हा आईची कसोटीही लागतेच. आजवर स्वत:चं दु:ख बाजूला ठेऊन अरुंधतीने मुलांच्या सुखाचाच विचार केला आहे. म्हणूनच मुलांच्या सुखाआड येऊ पाहणाऱ्या संजनाला अरुंधतीने खणखणीत उत्तर दिलं आहे.