महाराष्ट्र, गोव्यासह सहा राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्र, गोव्यासह सहा राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या चार दिवसात महाराष्ट्र, गोव्यासह सहा राज्यांच्या किमान भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सूनच्या परतीला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकातील किनारपट्टी भाग, केरळ आणि पुद्दुचेरी येथील भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागात 9 ऑक्टोबरला देखील मुसळधार पाऊस पडू शकतो. या राज्यांव्यतिरिक्त, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही 10 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या क्षेत्रात 11 ऑक्टोबर रोजी या मुसळधार पाऊस पडू शकतो. आज (शुक्रवार) अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यावर्षीच्या पावसाचा आढावा

एकूणच, देशात जूनमध्ये 110 टक्के, जुलैमध्ये 93 टक्के आणि ऑगस्टमध्ये 76 टक्के पाऊस झाला आहे. या महिन्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाला असला तरी सप्टेंबरमध्ये त्याची उणीव भरून निघाली, कारण सप्टेंबरमध्ये 135 टक्के रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला आहे. पुण्यासह ठाणे आणि घाट परिसरात तर ढगफुटीसदृश पाऊस झाला. पुढील पाच दिवस राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अधिक असणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आता बंगालच्या उपसागरात पुढील तीन दिवसांत पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. 10 ० ऑक्टोबरनंतर पुढील चार ते पाच दिवसांत हे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून 10 ऑक्टोबरलख महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे.

आयएमडीच्या नॅशनल वेदर फोरकास्टिंग सेंटरचे वरिष्ठ पूर्वानुमानकार आर के जेनामणी यांनी सांगितले की, 1960  सालानंतर ही दुसरी वेळ आहे, जेव्हा मान्सून इतक्या उशिरा परतत आहे. 2019 साली 9 ऑक्टोबरपासून मान्सून वायव्य भारतातून परतण्यास सुरुवात केली होती.