बिग बॉसच्या घरात गायत्रीने दाखवली खिलाडूवृत्ती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बिग बॉसच्या घरात गायत्रीने दाखवली खिलाडूवृत्ती

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला ‘बिग बॉस’ सिझन ३ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्री दातारचाही यात समावेश आहे. गायत्री या घरात आता बऱ्यापैकी रुळली आहे. आता गायत्री बिग बॉसच्या घरात कॅप्टन बनणार का? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवनवीन खेळ, डावपेच, टास्क यांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येक स्पर्धक मोठ्या कसोशीने खेळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अनेक नवीन नाती तयार होतात. ते कधी प्रेमाचे असते तर कधी मैत्रीचे. गायत्री दातार आणि जय दुधाणे या दोघांची छान मैत्री झाली आहे.

काही दिवसांपूर्वी दोन टीम तयार करण्यात आल्या. गायत्री आणि जय एकमेकांविरुद्धच्या टीममध्ये होते. त्यांना दिलेले टास्क दोघांनीही आपली मैत्री कुठेही मध्ये न आणता खिलाडूवृत्ती दाखवत यशस्वीरित्या पूर्ण केले. ‘बिग बॉस’च्या आदेशानुसार यावेळेच्या कॅप्टनपदाचा दावेदार निवडण्याची संधी गायत्रीच्या टीमला मिळाली आहे. गायत्री दातार यावेळी कॅप्टन बनणार का? हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी ३’च्या या पर्वाला सुरुवात होवून आठवडा पूर्ण होण्याआधीच घरात अनेक डावपेच सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. घरामध्ये न कळत दोन गट पडले असून दोन्ही गटात एक शीतयुद्ध सुरु झाल्याचं दिसून येत आहे.