निवडणुकीच्या तोंडावर दौरे करून काय होणार नाही - प्रवीण दरेकर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

निवडणुकीच्या तोंडावर दौरे करून काय होणार नाही - प्रवीण दरेकर

पुणे : राज्यात अवघ्या काही महिन्यांवर महापालिका निवडणूक येऊ ठेपली आहे. सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच मंत्रिमंडळीही जिल्ह्यांना भेटी देत आहेत. कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्याबरोबरच नागरिकांमध्ये पक्षाबद्दलच्या विकासकामांची माहिती पोहोचवण्याचं काम चालू आहे. पुण्यातही गेल्या दोन महिन्यात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी अशा सर्व पक्षाचे राजकीय नेते येऊ लागले आहेत. त्यावरच प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलं आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

दरेकर म्हणाले, ''पुण्यातील मतदार हा सजग मतदार आहे. मतदान करताना माणूस आणि विकासकाम पाहून तो मत देतो. त्यामुळं कोणाच्या हाती सत्ता द्यायची हे त्यांना माहीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अनेक राजकीय नेते आणि मंत्रीमंडळी निवडणुकीच्या तोंडावर दौरे करत आहेत. त्यानं काही होत नसल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.''