पुंछमध्ये झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पुंछमध्ये झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद

श्रीनगर,: जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये आज, सोमवारी झालेल्या चकमकीत सैन्याचे 5 जवान शहीद झाल्याची घटना घडली. जिहादी दहशतवाद्यांसोबत झालेल्या या चकमकीनंतर या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आलाय. भारतीय सैन्याने गुप्त माहितीच्या आधारे पुंछ भागातील जंगलात लपून बसलेल्या जिहादी दहशतवाद्यांना घेरले. सुरणकोटे भागात डेरा कि गली या भागात हे अभियान सुरू असताना ही चकमक उडाली. सैन्याने या पूर्ण परिसराची घेराबंदी केलीय.