पाकिस्तानात ६.० रिश्टर स्केलचा भूकंप, २० लोकांचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पाकिस्तानात ६.० रिश्टर स्केलचा भूकंप, २० लोकांचा मृत्यू

इस्लामाबाद, ७ ऑक्टोबर (हिं.स.) : पाकिस्तानच्या दक्षिणेकडील हरनाई भाग गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्क्याने हादरला, यात किमान २० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, पहाटे ३.३०च्या सुमारास ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप पाकिस्तानाच्या हरनाई येथे झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे दक्षिण पाकिस्तानात आलेल्या भूकंपामध्ये किमान २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. बलुचिस्तानच्या प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रमुखाने सांगितले की, आतापर्यंत १५ ते २० लोकांचा बळी गेला आहे.