अफगाणिस्तानातील स्फोटातील मृतांची संख्या शंभरवर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अफगाणिस्तानातील स्फोटातील मृतांची संख्या शंभरवर

नवी दिल्ली, : उत्तर अफगाणिस्तानातील शिया मुस्लिमांच्या धार्मिक स्थळावर करण्यात आलेल्या स्फोटातील मृतांची संख्या शंभरवर पोहोचली आहे. हा स्फोट कुंडुझ प्रांताची राजधानी असलेल्या कुंडुझ येथे झाला आहे. मात्र अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.आत्मघातकी हल्लेखोराने हा हल्ला केला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिया मशिदीत हा स्फोट करण्यात आला असून त्यात शिया मुस्लिमांना लक्ष्य केले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तालिबानच्या पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून याप्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.