रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात बदल नाही

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात बदल नाही

मुंबई : रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट अर्थात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या द्विमासिक आढावा बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरणाविषयी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. यानुसार, देशातील रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, रिव्हर्स रेपो रेट देखील 3.35 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. याआधी देखील 6 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये देखील हे व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
देशातील महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी, कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम नियंत्रित करण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती पूर्ववत येईपर्यंत देशाचं पतधोरण सर्वसमावेशकच ठेवलं जाईल”, अशी प्रतिक्रिया शक्तिकांत दास यांनी दिली आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. गेल्या पतधोरण आढावा बैठकीच्या तुलनेत अर्थव्यवस्था काहीशी सावरली आहे. विकासदराच्या बाबतीत देखील सकारात्मक चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येण्याची आशा असल्याचे शक्तीकांत दास यांनी नमूद केले.