बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोपावरून आणखी एकाला अटक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोपावरून आणखी एकाला अटक

मुंबई: महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोपावरून महाराष्ट्रातील नांदेड, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि ठाणे जिल्ह्यातून 10 जणांना समन्स बजावून चौकशीला बोलावले होते. हे 10 जण जन मोहम्मद शेख आणि उर्वरित आरोपींच्या अगदी जवळचे होते. या सर्वांवर या पूर्वीच एटीएसची नजर होती. या 10 जनातील इरफान नावाच्या संशयिताला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख वय 50 वर्षे. पेशाने लेडीज टेलर आहे. त्याला मुंबईच्या वांद्रे येथील खेरवाडी भागातून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यातले दोघेजण महाराष्ट्राचे आहेत. तर त्यातीत एक जण हा मुंबईचा आहे अशी माहिती समोर आल्यानंतर राज्यात गोंधळ उडाला आणि अनेक चर्चांना उधाण आले. आता याबाबत अधिक माहिती देण्यासाठी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. ATS प्रमुख विनीत अग्रवाल म्हणाले की, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. काल अटक करण्यात आलेल्या 6 पैकी एक व्यक्ती धारावी, मुंबई येथील आहे. त्याचे डी-कंपनीचे लिंक्स होते. संबंधीत इसम हा दिल्लीला ट्रेनमध्ये जात असताना कोटा येथे त्याला अटक करण्यात आली. 

तेव्हा बोलताना अग्रवाल म्हणाले होते आमच्या रडारवर हजार लोकं असतात पण, सगळेच दोषी सिद्ध होत नाही. आम्हाला अनेकदा दहशतवादी हल्ल्याचे इशारे मिळत असतात पण सगळी माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. एक इसम मुंबई सेंट्रलहून निजामुद्दीमकडे प्रवास करतो पण प्रवासादरम्यानच त्याला राजस्थानच्या कोटामध्ये अटक करण्यात येते यात एटीएसचे अपयश कसे असू शकते असा सवालही उपस्थित करत एटीएस योग्यरीत्या काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दहशतवाद रोखण्यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाली फ्री हॅण्ड दिले आहेत. मुंबई लोकलची रेकी करण्यात आली नाही, रेकी करण्याआधीच त्याला अटक केली गेली असून त्याची चौकशी चालू आहे. सोबतच त्याच्या कुटुंबाचीही चौकशी चालू आहे. राज्यात कुठेही दहशतवाद नसून राज्य आणि मुंबई सुरक्षित असल्याचं एटीएस प्रमुख म्हणाले आहेत.