हिंद महासागरात भारतीय हवाई दल-अमेरिकी नौदल यांच्यात संयुक्त युद्धसराव

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

हिंद महासागरात भारतीय हवाई दल-अमेरिकी नौदल यांच्यात संयुक्त युद्धसराव

नवी दिल्ली,  : हिंदी महासागर प्रदेशातील (आयओआर) मित्र देशांच्या संरक्षण दलांबरोबर धोरणात्मक संपर्काचा भाग म्हणूनभारतीय हवाई दल 23-24 जून रोजी रोनाल्ड रेगन कॅरियर स्ट्राइक ग्रुप (सीएसजी) बरोबर होणाऱ्या युद्धसरावामध्ये  अमेरिकन नौदलाबरोबर सहभागी होणार आहे. सीएसजी सध्या हिंद महासागर प्रदेशात (आयओआर) तैनात आहे.

दक्षिण एअर कमांडच्या एओआरमधील कवायतींमध्ये भारतीय हवाई दल चार ऑपरेशनल कमांडअंतर्गत तळांवरुन परिचालन करताना पहायला मिळणार असून त्यात जॅग्वार आणि सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमाने,  अवॅक्स प्रणाली असलेली विमानेएईडब्ल्यू अँड सी ही आकाशात टेहळणी करणारी आणि इशारा देणारी रडारसज्ज विमाने आणि  हवेतल्या हवेत इंधन भरणाऱ्या विमानांचा समावेश असेल. अमेरिकेच्या सीएसजीकडून एफ-18 लढाऊ विमाने आणि ई-2हॉक आय एईडब्ल्यू अँड सी विमाने सहभागी होतील अशी अपेक्षा  आहे. या कवायती तिरुवनंतपुरमच्या दक्षिणेला पश्चिम किनारपट्टीवर दोन दिवस होणार आहेत.