मॉस्किरिक्समुळे मलेरियामुळे होणारे मृत्यू कमी होतील; केवळ 30% प्रभावीपणा असूनही का महत्त्वाची ठरतेय ही लस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मॉस्किरिक्समुळे मलेरियामुळे होणारे मृत्यू कमी होतील; केवळ 30% प्रभावीपणा असूनही का महत्त्वाची ठरतेय ही लस

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) बुधवारी प्राणघातक मलेरियाविरुद्ध लसीला मंजूरी दिली आहे. ही लस पी. फाल्सिपेरम विरूद्ध प्रभावी आहे, जे जगातील सर्वात घातक मलेरिया पॅरासाइट मानले जाते. ही जगातील पहिली मलेरियावरील लस आहे, ज्याची क्लिनिकल डेव्हलपमेंट प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) कडून सकारात्मक वैज्ञानिक मत देखील प्राप्त झाले आहे.

सध्या, संपूर्ण जग कोविड -19 साथीच्या आजाराशी लढत आहे. त्याच्याविरुद्ध लसीची प्रभावीता 95%पर्यंत नोंदवली गेली आहे. या प्रकरणात, मलेरिया लस केवळ 30% प्रभावी आहे. तरीदेखील याला गेम चेंजर म्हटले जात आहे. असे का? ही लस काय आहे? कोणी बनवली? मलेरियाविरोधातील युद्धात हे शस्त्र कसे सिद्ध होईल?