कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनीच निर्बंधांचे कडक पालन करावे - बाळासाहेब थोरात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनीच निर्बंधांचे कडक पालन करावे - बाळासाहेब थोरात

अहमदनगर :- कोरोना हा अदृश्य शत्रू आहे.तो कोणत्याही रुपाने माणसाच्या शरीरात प्रवेश करतो.म्हणून कोरोनाचे संकट टाळण्यासाठी प्रत्येकाने शासकीय निर्बंधांचे कडक पालन करावे,असे आवाहन करताना कोरोनाची लक्षणे आढळणार्या व्यक्तींचे उपचारांसाठी तातडीने विलगीकरण करावे असे सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. थोरात म्हणाले की,कोरोना संकट थांबविण्यासाठी  महाविकास आघाडी सरकार अत्यंत कार्यक्षमपणे काम करत आहे.प्रशासनातील व्यक्ती ही रात्रंदिवस काम करत आहे.मात्र याला नागरिकांचे ही सह कार्य मिळणे अत्यंत गरजेचे आहे.संगमनेर तालुक्यात घरोघर तपासणी केली जात आहे.आजारांचे कोणतीही लक्षणे असलेल्या व्यक्तींचे तातडीने विलगीकरण करा.कारण घरात एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली तर संपूर्ण कुटुंब बाधित होते.आणि मग अवस्था वाईट होते.म्हणून कोणीही निष्काळजीपणा करू नका.ऑक्सि जन पुरवठा मूलभूत औषधे पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपण वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केले आहेत

आता गरज आहे ती प्रत्येकाने जागरूक होत आपल्या परिसरात आपल्याजवळ कुणालाही कोणत्याही आजाराची काही लक्षणे आढळली तर त्याचे तातडीने संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक गावात ग्राम आरोग्य सुरक्षा दलाने अधिक कार्यक्षमपणे काम करणे गरजेचे आहे.जास्तीत जास्त तपासणी करून रुग्ण शोध मोहीम अधिक प्रभावी करा.याच बरोबर नागरिकांचे लसीकरण करताना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी काळात कोरोणा मुक्त गावाकडे प्रत्येक गावाची वाटचाल होण्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.