भारतात 24 तासात 1,73,790 नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात 24 तासात  1,73,790 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात  1,73,790  नवे कोरोना रुग्ण आढळले असून  3,617 नागरिकांचा मृत्य झाला आहे.  2,84,601  नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे  2,77,29,247 रुग्ण झाले असून एकूण  2,51,78,011 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या  22,28,724 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 3,22,512 आहे. आतापर्यंत देशात 20,89,02,445 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 20,80,048 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण  34,11,19,909 चाचण्या घेण्यात आल्या.