पत्रकारास मारहाण करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पत्रकारास मारहाण करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

अहमदनग : अहमदनगर शहरातील केडगाव उपनगर परिसरात राहाणारे पत्रकार मुरलीधर तांबडे व त्यांच्या कुटुंबीयांना चौघा जणांनी घरात बसून शिवीगाळ करत मारहाण करण्याच्या घटने संदर्भात पोलीसांनी ३ जणांना अटक केली असून या सर्वांना न्यायालयाने १ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
 याबाबत अभिजीत अजिनाथ तांबडे (वय १८,राहणार शास्त्रीनगर,केडगाव) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील मच्छिंद्र घोगरे हा फरार असून तुषार घोगरे, राहुल ससाणे व विशाल कोतकर या तिघां आरोपीना पकडण्यात आले.तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.पोलीस अधीक्षक मनोज पाटील,शहर विभागाचे उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक भंगाळे,उपनिरीक्षक शिरसाट,महाजन आदिंच्या पथकाने केली.पत्रकार तांबडे यांना मारहाणीच्या या घटनेचा तीव्र निषेध करीत विविध पत्र कार संघटनांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.३ आरोपी अटक केल्यानंतर शहरातील सर्व पत्रकार संघटना व पत्रकारांनी पोलीसांच्या टीमचे अभिनंदन केले.दरम्यान या घटनेतील फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.