रेफ्रिजरेटर्सच्या नव्या मालिकेसह हायर इंडियाने वाढवली सणासुदीच्या दिवसांची रंगत

0

मुंबई, दि. 22 : घरगुती आणि ग्राहकोपयोगी उपकरणांच्या क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनीआणि प्रमुख उपकरणांच्या विभागामध्ये सलग 9 वर्षे जगातील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड* अशी ओळख राखून असलेली हायरने आपल्या बॉटम माउंटेड, टॉप माउंडेट आणि डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर्सची नवीकोरी श्रेणी बाजारात दाखल करून सणासुदीच्या मोसमाची धडाकेबाज सुरुवात केली आहे आणिसणासुदीच्या दिवसांतील आनंदात आणखी भर टाकली आहे.
उंची ग्लास-फिनिश असलेली हे नवी दिमाखदार मॉडेल्स हायरब्रँडचे भारतीय बाजारपेठेतील स्थान अधिक पक्के करण्यास मदत करतील, तसेच नवी वैविध्यपूर्ण उत्पादनश्रेणी ग्राहकांसमोर ठेवतील. बॉटम आणि टॉप माऊंटेडरेफ्रिजरेटर्स नव्याको-या स्पायरल ग्लास फिनिशसह उपलब्ध आहेत, तर डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर्स स्पायरल आणि वेव्ह अशा दोन ग्लास स्टाइल्समध्ये उपलब्ध आहेत.
भारतीय घरांतील किचन्समधील आधुनिक अंतर्गत सजावट ध्यानात ठेवून हे पॅटर्न्सस तयार करण्यात आले आहेत. स्पायरल ग्लास पॅटर्नमधून शांततेचा अनुभव मिळतो आणि एकूणच घराला एक अभिजात सौंदर्य प्राप्त होते. शैलीदारपणाचा थोडा अधिक दिमाख मिरविणारे वेव्ह ग्लास पॅटर्न हे एखाद्या अभिजात कलाकृतीप्रमाणे तुमच्या गृहसजावटीशी मेळ साधते आणि तुमच्या किचनच्या देखणेपणात भर टाकते.

Share.

About Author

Leave A Reply