नाशिक जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 1 हजार 315ने घट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नाशिक जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 1 हजार 315ने घट

 नाशिक :- जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 11 हजार 950 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 3 हजार 553 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 1 हजार 315  ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 3 हजार 825 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक 2 हजार 474, चांदवड 1 हजार 34, सिन्नर 1 हजार 988, दिंडोरी 1 हजार 443, निफाड 2 हजार 368, देवळा 1 हजार 23, नांदगांव 595, येवला 446, त्र्यंबकेश्वर 336, सुरगाणा 490, पेठ 110, कळवण 762, बागलाण 1 हजार २३१, इगतपुरी ४१४, मालेगांव ग्रामीण ९१९ असे एकूण १५ हजार ६३३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १५ हजार ७६४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५२२ तर जिल्ह्याबाहेरील ३१९ असे एकूण ३२ हजार २३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ५३ हजार ०८२ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८६.४३ टक्के, नाशिक शहरात ९१.६२ टक्के, मालेगाव मध्ये ८४.८१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.५८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.५० इतके आहे. मृत्यु : नाशिक ग्रामीण १ हजार ८०४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ६४९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २७३ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ३ हजार ८२५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. लक्षणीय : ३ लाख ५३ हजार ०८२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख १६ हजार १९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३३ हजार २३८ पॉझिटिव्ह रुग्ण. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.५० टक्के.