विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची दरवाढ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची दरवाढ

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने विनाअनुदानित १४.२ किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. परिणामी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ८५९ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत. याआधी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर प्रति सिलेंडर ८३४ रुपये ५० पैसे इतके होते. या दरवाढीने सर्वसामान्यांसह गृहिणींना पुन्हा एकदा मोठा झटका बसणार आहे.

ही वाढ सोमवारी रात्रीपासून लागू करण्यात आली आहे. शक्यतो महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमती बदलतात, मात्र आता पुन्हा एकदा एलपीजी गॅसचे दर वाढले आहेत. या वाढीनंतर मुंबईत एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ८५९ रुपये ५० पैसे झाले आहेत, दिल्लीतही दर एवढेच आहेत. तर कोलकाता आणि लखनऊमध्ये दर अनुक्रमे ८८६ रुपये आणि ८९७ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत. दरम्यान १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीतही ६८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या सिलेंडरची किंमत दिल्लीत १६१८ रुपये झाली आहे. या आधी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपये ५० पैशांची वाढ केली होती.