उदयनराजेंना कोरोनाची लागण, पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

उदयनराजेंना कोरोनाची लागण, पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

पुणे: भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिल्लीहून परतल्यानंतर उदयनराजे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे वैद्यकीय तपासणीत त्यांची कोविड चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मागील चार दिवसांपूर्वीच उदयनराजेंना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी उदयनराजेंच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने आणि बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले.