‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार नव्या पात्राची एण्ट्री?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार नव्या पात्राची एण्ट्री?

स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकाआई कुठे काय करते?’मध्ये दररोज काही ना काही नवे घडत आहे. आता अरूंधती आणि अनिरूद्धच्या घटस्फोटाला अवघा एक आठवडा आहे. आपण जाण्याअगोदर यश आणि गौरीचा साखरपुडा व्हावा ही अरूंधतीची मनापासूनची इच्छा. या इच्छेला आजी देखील परवानगी देते. अरूंधतीचा देशमुख कुटुंबातील हा शेवटचा सोहळा. आता या सोहळ्यात एका नव्या पात्राची एन्ट्री होते.

समृद्धीबंगल्यात गौरी-यशच्या साखरपुड्याची जय्यत सुरू आहे. अशावेळी आतापर्यंत कधीच दाखवलेलं पात्र पहिल्यांदाच सगळ्यांसमोर येणार आहे. आप्पा देशमुख यांचा दुसरा मुलगा आणि अनिरूद्धचा लहान भाऊ अविनाशची या मालिकेत एण्ट्री होणार आहे. आतापर्यंत अनिरुद्ध देशमुख हे पात्र मालिकेत दाखवण्यात आलं नाही. पहिल्यांदाच अविनाश देशमुख प्रेक्षकांना भेटणार आहे. अभिनेता शंतनु मोघे अविनाश देशमुखचं पात्र साकारणार आहे.