तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पडझड ; मोठे नुकसान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पडझड ; मोठे नुकसान

सिंधुदुर्ग : तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे पडझडीच्या घटना मोठयप्रमाणात घडल्या आहेत. जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसान आणि वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड होऊन छपरे उडून गेली आहेत. विद्युत पोल कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे. झाड रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाली आहे.

 

 ठिकठिकाणी झाडे हटवून वाहतूक सुरू करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पालकमंत्री उदय सामंत जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. पहाटे 4 वाजता त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. दरम्यान समुद्र खवळलेला असून मोठया लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या नुतनीकरण सुरू असलेल्या सभागृहाचा छपराचा भाग कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणती मनुष्यहानी झाली नाही. आंबोली घाटात काही ठिकाणी दरड कोसळून माती रस्त्यावर आली.