टोकियो ऑलिंपिक : रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूचे अजित पवारांकडून कौतुक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टोकियो ऑलिंपिक : रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूचे अजित पवारांकडून कौतुक

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचे रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. मीराबाई चानू यांनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मिळवलेले यश भारतीय संघातील अन्य खेळाडूंना उत्तम कामगिरी करुन पदक जिंकण्यासाठी प्रेरणा, विश्वास देईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीराबाई चानू यांचे कौतुक केले.

2016 च्या रिओ ऑलिंपिकमधल्या अपघाती अपयशावर मात करुन मीराबाई चानू यांनी यंदाच्या टोकियोमध्ये जिंकलेले पदक हे अपयशाने खचून न जाता नव्या ऊर्जेने जीवनात कसं यशस्वी व्हावे, याचे आदर्श उदाहरण असल्यांचही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. भारतीय हॉकी संघाने आपला पहिला सामना न्यूझिलंडविरुद्ध 3-2 असा जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले असून अन्य खेळाडूंनाही उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.