तुर्कस्थानातील वणव्यात तिघांचा मृत्यू, 50 जखमी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तुर्कस्थानातील वणव्यात तिघांचा मृत्यू, 50 जखमी

अंकारा  : दक्षिण तुर्कस्थानातील जंगलाला लागलेल्या वणव्याची झळ आता नागरी वस्तीलाही बसू लागली आहे. शहरातील जवळपास 60 ठिकाणी आग लागल्याची घटना समोर आली आहे. या अग्नितांडवात 3 जण ठार झाले आहेत. दरम्यान तुर्कस्थानच्या राष्ट्रपतींनी या आगीच्या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात तुर्कस्थानचे कृषी आणि वन मंत्री बेकिर पाकडेमीर्ली यांनी सांगितले की, बुधवारी आणि गुरुवारी जंगलाला आग लागण्याच्या 53 घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. तुर्कीतील अंतल्या भागात ठार झालेल्या तिघांमध्ये 82 वर्षाच्या एका ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश आहे. ही व्यक्ती अकसेकीमध्ये वास्तव्य करत होती. हा भाग दक्षिण तुर्कीच्या किनारपट्टीत येतो. आगीच्या घटनेमुळे 20 गावे आणि जवळपासचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. आगीत होरपळून जखमी झालेल्या नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवळपास 50 जणांवर उपचार सुरू आहेत. त्याशिवाय, तुर्कीमधील अन्य 16 ठिकाणीदेखील आगी लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये गुवेरसिनलिक आणि इस्मेलेर या भागांचाही समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. या भागातील उष्ण आणि आर्द्रता वातावरण असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचणी येत आहेत.