गांधीनगर महापालिका निवडणुकीत भाजपची विजयाकडे वाटचाल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गांधीनगर महापालिका निवडणुकीत भाजपची विजयाकडे वाटचाल

गांधीनगर, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आयोजित गुजरातची राजधानी गांधीनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप मोठी आघाडी घेत ज्वलंत विजयाकडे वाटचाल करीत आहे.
भाजपच्या या कामगिरीचा जल्लोष करण्यासाठी मंगळवारी मोठ्या प्रमाणात नागरिक गांधीनगरच्या विविध भागात जमा झाले तसेच जल्लोषासह मिठाई वाटप करीत त्यांनी आनंदोत्सवात साजरा केला. भाजपच्या समर्थक, कार्यकर्ते आणि प्रशंसकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गांधीनगर महानगर पालिकेच्या 44 जागांसाठी रविवारी रविवारी मतदान घेण्यात आले. दुपार पर्यंत मतमोजणीत 44 पैकी जवळपास 20 पेक्षा अधिक ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. विशेष म्हणजे गुजरातचे नूतन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात ही पहिलीच निवडणूक आहे.