पुलवामात‌‌ ‌3‌ ‌‌दहशतवाद्यांचा‌‌ ‌‌खात्मा‌

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पुलवामात‌‌ ‌3‌ ‌‌दहशतवाद्यांचा‌‌ ‌‌खात्मा‌

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. यात 'लष्कर तोयबा'चा टॉप कमांडर एजाज उर्फ अबू हुरैरा याचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात 14 जणांना कंठस्नान घातले आहे.
पुलवामा सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सैन्याला मिळाली. त्यानंतर सैन्यांच्या जवानांनी या परिसराला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यानंतर दहशतवादी आणि जवानांनामध्ये गोळीबार सुरु झाला. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अजूनही या भागात दोन दहशतवादी लपून बसले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्करचा कमांडर अबू हुरैरा याचाही समावेश आहे. घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. तसेच दहशतवाद्यांचे मृतदेह ही जवानांनी ताब्यात घेतले आहेत.
काश्मीरच्या आयजीपी यांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक लष्कर--तैयबाचा पाकिस्तानी कमांडर एजाज उर्फ अबू हुरैरा आहे. यासह दोन स्थानिक दहशतवादीही ठार झाले आहेत. तथापि, अद्याप सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे.जुलै महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये 14 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यापूर्वी 2 जुलै रोजी पुलवामामध्ये दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले. त्यानंतर 8 जुलै रोजी 2 पाकिस्तानी दहशतवादी चकमकी दरम्यान मरण पावले. या ऑपरेशनमध्ये एक ज्युनियर कमिशन ऑफिसरसह दोन जवान शहीद झाले. 12 जुलै रोजी राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये दादलच्या जंगलात जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलेय.