झिका आजाराचा पहिला रुग्ण पूर्णपणे बरा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

झिका आजाराचा पहिला रुग्ण पूर्णपणे बरा

मुंबई : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील झिका आजाराची लागण झालेली राज्यातील पहिली महिला रुग्ण आढळून आली असून ती पूर्णपणे बरी झाली आहे. तिला कुटुंबीयांना कोणतीही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

बेलसर गावातील एका पन्नास वर्षांच्या  महिलेस विषाणू आजाराची बाधा झाल्याचा अहवाल ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. तिला चिकनगुनियाची बाधा झाली असून हा मिश्र विषाणू संसर्ग  आहे.

राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, साहाय्यक संचालक, हत्तीरोग डॉ. कमलापुरकर, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप या राज्यस्तरिय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास शनिवारी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पथकाने सरपंच आणि  ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या.