ट्वीटरवर अंकुश आणून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेणे योग्य नाही - नवाब मलिक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ट्वीटरवर अंकुश आणून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेणे योग्य नाही - नवाब मलिक

मुंबई : केंद्रसरकारच्या माध्यमातूनट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले असून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय हे योग्य नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.  ट्वीटर हे असे माध्यम होते ज्यावर लोकं निर्भिडपणे आपली बाजू मांडत होते. सत्य परिस्थिती लोकांसमोर आणत होते. मात्र ज्यापध्दतीने देशभरात इतर माध्यमांवर अंकुश ठेवण्याचे काम केंद्रसरकारच्या माध्यमातून होत आहे. त्याचपध्दतीने ट्वीटरवर अंकुश ठेवला जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.  ट्वीटर हे एकच माध्यम राहिले होते जिथे लोकं स्वतःची निर्भिड बाजू मांडत होते. एखादा व्यक्ती चुकीची माहिती टाकत असेल किंवा खोटी अफवा पसरवत असेल तर आयटी सेलच्या विविध कलमान्वये त्यांच्यावर कारवाई होत होती असेही नवाब मलिक म्हणाले.  ट्वीटरवर कुणाचा अंकुश नव्हता परंतु आता केंद्रसरकार थेट ट्वीटरवर अंकुश ठेवणार असून याबाबत नवाब मलिक यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.