देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरीकांना मॉडर्नाची लस कशी दिली जाते? - नवाब मलिक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरीकांना मॉडर्नाची लस कशी दिली जाते?  - नवाब मलिक

मुंबई : देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरीकांना Moderna ची लस देण्याचे काम कुठल्या पध्दतीने सुरू आहे. जर जनतेला परवानगी मिळत नाही मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? याचा खुलासा केंद्रसरकारने करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.  

 देशात लस तुटवडा असल्याचे केंद्रसरकार सांगतेय. केंद्रसरकारने भारत बायोटेक आणि सिरम इन्स्ट्यिट्यूट व स्फुटनिकला परवानगी दिली आहे. असे असताना या देशात आणि मुंबईच्या आजुबाजुला Moderna कंपनीच्या लसीचे लसीकरण सुरू आहे अशी माहिती उपलब्ध झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. हे लसीकरण विदेशातील दुतावास आहेत. विशेषतः फ्रान्स या देशातील नागरीक भारतात व मुंबईत आहेत. त्यांना Moderna ची लस देण्यासाठी काही हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दुतावासातील नागरीकांचे भारतीय नातेवाईकांनाही लसीकरण करण्यात येत आहे असेही नवाब मलिक म्हणाले. तीनच कंपन्यांना परवानगी असताना Moderna ची लस कशी काय दिली जातेय असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.