आयआयएफएल होम फायनान्सतर्फे एनसीडी निधी उभारण्यासाठी ड्राफ्ट शेल्फ प्रॉस्पेक्टस सादर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आयआयएफएल होम फायनान्सतर्फे एनसीडी निधी उभारण्यासाठी ड्राफ्ट शेल्फ प्रॉस्पेक्टस सादर

मुंबई :रिटेल क्षेत्रावर लक्ष केंद्रीत असलेली आणि तंत्रज्ञानाधारीत गृह वित्त कंपनी आयआयएफएल होम फायनान्स लि. (आयआयएफएलएचएल) यांच्यातर्फे एकूण रु.50,000 दशलक्षपर्यंतच्या (शेल्फ लिमिट) इश्यु) रकमेसाठी सिक्युअर्ड नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या (सिक्युअर्ड एनसीडी)आयआयएफएल होम फायनान्सतर्फे एनसीडी निधी उभारण्यासाठी ड्राफ्ट शेल्फ प्रॉस्पेक्टस सादर क्युअर्ड एनसीडी आणि अनसिक्युअर्ड एनसीडी यांना एकत्रितपणे एनसीडी म्हणतात) पब्लिक इश्युसाठी बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (स्टॉक एक्स्चेंजेस) ड्राफ्ट शेल्फ प्रॉस्पेक्टस फाइल केले आहे. प्रत्येक सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड एनसीडीचे दर्शनी मूल्य प्रत्येकी रु.1,000 इतके असेल आणि ते एक किंवा त्याहून अधिक भागांमध्ये जारी करण्यात येतील. ऑनवर्ड कर्जवाटप, वित्तसहाय्य आणि कंपनीने घेतलेल्या कर्जाच्या व्याजाच्या व मुद्दल रकमेच्या परतफेडीसाठी/मुदतपूर्वफेडीसाठी, त्याचप्रमाणे सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांची पूर्तता करणे हा या एनसीडी इश्युचा हेतू आहे. 31 मार्च 2021 रोजी कंपनीचा पुनर्रचना केलेल्या आर्थिक ताळेबंदानुसार (रिफॉरमॅटेड स्टेटमेंटध सीआरएआर - टिअर 1 कॅपिटल 19.61% होते. या प्रस्तावित एनसीडींसाठीचे क्रेडिट रेटिंग क्रिसिल रेटिंग्ज लि.ने क्रिसिल एए/स्टेबल असे दर्शविले आहे आणि ब्रिकवर्क रेटिंग्ज इंडिया प्रा. लि.ने बीडब्ल्यूआर एए+/निगेटिव्ह (असाइन्ड) असे दर्शविले आहे. श्रेणी 1, श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि अल्प उत्पन्न गटांमधील प्रथमच घर घेऊ इछ्छिणाऱ्यांना कर्ज प्रदान करणे यावर आयआयएफएलएचएफएलतर्फे भर देण्यात येतो. 

31 मार्च 2021 पर्यंत त्यांच्या रु.206,936.87 दशलक्ष व्यवस्थापनांतर्गत मत्तेपैकी (एयूएम) पगारदार व स्वयंरोजगार असलेल्या ग्राहकांचे प्रमाण अनुक्रमे 44.37% आणि 55.63% होते. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये हे प्रममाण 20.64% या सीएजीआरने वाढले आहे. त्यांच्या गृह कर्जाची सरासरी रक्कम ही रु.1.73 दशलक्ष इतकी आहे. आयआयएफएल ग्रुपच्या 2300+ संपर्क बिंदूंव्यतिरिक्त या कंपनीचे कामकाज 16 राज्ये व 1 केंद्रशासित प्रदेशातील एकूण 125 शाखांच्या माध्यमातून सुरू आहे. 2021 या गेल्या आर्थिक वर्षामध्ये त्यांची 85.16% गृहकर्जे डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. तंत्रज्ञानात गुंतवणूक केल्यामुळे ग्राहकांच्या अनुभवात सुधारणा घडवून आणण्यासाठी कंपनीला मदत झालीच, त्याचबरोबर ऑपरेटिंगचा खर्च कमी झाला आणि नव्या बिझनेस संधींचा विकास करता आला.