महाराष्ट्रात आता घरबसल्या मिळणार 'लर्निंग लायसन्स'; RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्रात आता घरबसल्या मिळणार 'लर्निंग लायसन्स'; RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही

मुंबई - शिकाऊ वाहन चालक परवाना आणि नवीन खासगी दुचाकी चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल टाकले असून भविष्यातही शासकीय विभागांना ज्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देणे शक्य आहे त्या उपलब्ध करून देण्यासाठी गर्व्हनर्स आधारित नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

"सारथी ." या अद्ययावत प्रणालीअंतर्गत आधार क्रमांकांशी संलग्न असलेल्या ऑनलाईन शिकाऊ वाहन चालक परवाना तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

खर्चात बचतकामाचा ताणही कमी

राज्यात दरवर्षी सुमारे १५ लाखापेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात तसेच २० लाखाहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. या कामी नागरिकांचा अंदाजे १०० कोटी रुपयांचा खर्च होतो. आता या सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने खर्चात बचत होऊन नागरिकांचा वेळ श्रम ही वाचणार आहे. तसेच हे काम करणाऱ्या अंदाजे २०० अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत झाल्याने विभागाच्या कामाची दर्जोन्नती करणेही यातून शक्य होईल.

महाराष्ट्र विकासात अग्रेसर असलेले राज्य असल्याचं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तम सेवा महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जावा तसेच सुरक्षित प्रवासाबरोबर सर्वसामान्य जनतेला अधिकाधिक सेवा ऑनलाईन स्वरूपात देऊन त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम कसे वाचवता येतील यासाठी ही प्रयत्न केले जावेत. वेगवान आणि पारदर्शी सेवा उपलब्ध करून देतांना विभागाने सुरिक्षित परिवहन सेवेला प्राधान्य द्यावे अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.