सरकारमध्ये अविश्वासाचं वातावरण, मविआमध्ये अंतर्गत मतभेद - प्रवीण दरेकर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सरकारमध्ये अविश्वासाचं वातावरण, मविआमध्ये अंतर्गत मतभेद - प्रवीण दरेकर

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाायाखालची जमीन सरकली आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचे पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आघाडीत विसंवाद असून मविआ सरकारमध्ये अविश्वासाचं वातावरण असल्याचं स्पष्ट होतं, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. आघाडी तोडायला कोणीही गेलं नाही. तेच एकमेकांवर आरोप करत आहेत. दुसरीकडे एकत्र असल्याचा कांगावाही करत आहेत. संपूर्ण कोव्हिडच्या काळात या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काय निर्णय घेतलाकेंद्राने यांना मदत केली. यांना आपआपसातल्या भांडणातून फुरसत मिळत नाही. त्यांच्यात वाद आहेत. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात सतत काऊंटर करत आहेत, असं दरेकर म्हणाले.