शेतमजुराचा मुलगा बनला इस्त्रोत वैज्ञानिक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शेतमजुराचा मुलगा बनला इस्त्रोत वैज्ञानिक

पंढरपूर  : पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील सोमनाथ माळी या तरुणाची इस्त्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झालीय. अतिशय सामान्य कौटुंबित परिस्थिती असलेल्या सोमनाथचे आई-वडील शेतमजूर आहेत. त्यामुळे सरकारी शाळेतून शिक्षण घेणाऱ्या सोमनाथच्या यशाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होतेय.  सोमनाथच्या यशस्वी प्रवासाबद्दल माहिती देताना त्याच्या शिक्षकांनी सांगितले की, सरकोली गावातील सोमनाथचे वडील नंदू माळी हे शेतमजूर आहेत. तसेच सोमनाथची आई देखील शेतमजुरी करते. सोमनाथने ग्रामीण भागातील सरकारी शाळेतच शिक्षण घेतले आहे. सोमनाथने प्रायमरी पासून ते इयत्ता दहावी पर्यंत गावातच शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने पंढरपूरच्या केबीपी कॉलेजमधून 2011 साली 81 टक्के गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याने बी.टेक साठी मुंबईला प्रवेश घेतला. त्यानंतर नंतर आयआयटी दिल्लीसाठी तो मेकॅनिकल डिझायनर म्हणून निवडला गेला आणि त्याला भारतातून गेट परीक्षेत 916 वे स्थान मिळाले. इथूनच त्याला एअरक्राफ्ट इंजिन डिझाइन करण्याची संधी मिळाली. सोमनाथला गेल्या 2 जून रोजी इस्त्रोमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून निवडण्यात आले. सोमनाथने गावातील सरकारी शाळेपासून ते इस्त्रोपर्यंतचा प्रवास त्याने फारच कठिण परिस्थितींमध्ये पार केल्याचे त्याच्या शिक्षकांनी सांगितले.