करोनाविरुद्धच्या लढाईत देश आत्मनिर्भर झाला”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

करोनाविरुद्धच्या लढाईत देश आत्मनिर्भर झाला”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

देशातल्या वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे देश प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. वर्षभरात करोना प्रतिबंधक
लस तयार करुन देश आत्मनिर्भर झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. CSIR(Council of
Scientific and Industrial research)च्या आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वैज्ञानिक आणि
संशोधकांनी करोनाविरुद्धच्या लढ्यात दिलेल्या योगदानाविषयी त्यांचं कौतुक केलं.
भारतानं वर्षभरातच करोना प्रतिबंधक लस तयार केली आणि जगाला दिली. हे वैज्ञानिकांच्या परिश्रमाचं फळ
असल्याचंही मोदी म्हणाले. CSIRने आता समाजाशी संवाद साधून, त्यांच्या सल्ल्यांचा विचार करुन काम
करायला सुरुवात केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, CSIRबद्दल लोकांना माहिती मिळायला हवी. आपल्या देशातले वैज्ञानिक, संशोधक
कशासंदर्भातलं काम करत आहेत, हे त्यांना सोप्या भाषेमध्ये कळायला हवं. त्यामुळे तशी माहिती उपलब्ध करुन
देण्याचा सल्ला मी देत आहे. आपला देश आता सगळ्याच क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. आता आपल्याला योग्य
नियोजन करुन आणि निश्चित दिशेने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. करोनामुळे सध्या आपल्या
प्रगतीचा वेग मंदावला असला तरीही आत्मनिर्भर भारत हाच आपला संकल्प आहे. वैज्ञानिकांची करोनाकाळातली
परिश्रम करुन आत्मनिर्भर होण्याची भूमिका ज्याप्रमाणे आहे, तशीच भूमिका आपल्याला प्रत्येक क्षेत्रात घ्यायची
आहे, असंही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी सर्व वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभारही मानले.
कालच विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा
निर्णय विद्यार्थी हितासाठीच घेतला असल्याचंही सांगितलं. करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी,
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत केंद्र सरकारने ‘सीबीएसई’च्या दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा
निर्णय घेतला. मोदींच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठक हा निर्णय घेतला गेला. परीक्षेच्या
दडपणातून मुक्त झालेल्या विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्यासाठी गुरुवारी शिक्षण मंत्रालयाने दूरसंचार
माध्यमाद्वारे चर्चा आयोजित केली होती. या चर्चेत अचानक मोदींनी सहभागी होऊन सर्वांना अचंबित केले. तमाम
विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी परीक्षा रद्द केल्याबद्दल मोदींचे आभार मानले!