दियाने सावत्र मुलीसोबत केला डान्स

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दियाने सावत्र मुलीसोबत केला डान्स

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दिया चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता दियाने पती वैभव रेखीची मुलगी समायरासोबत एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ दियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत दिया आणि समायरा यांनी पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. या दोघी जस्टिन वेलिंगटनच्या ‘माय बेस्टी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी समायरा खाली पडते आणि त्यानंतर त्या दोघी हसताना दिसत आहेत. दियाची तिच्या सावत्र मुलीसोबत चांगली मैत्री असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी दियाने एक पोस्ट शेअर करत तिने १४ मे रोजी बाळाला जन्म दिल्याचे सांगितले होते. बाळाला वेळे आधीच जन्म दिल्यामुळे बाळ आयसीयूमध्ये असल्याचं तिने सांगितले होते.