करण जोहर होस्ट करणार बिग बॉस ओटीटी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

करण जोहर होस्ट करणार बिग बॉस ओटीटी

निर्माता, दिग्दर्शक करण जोहर हा यंदा बिग बॉस ओटीटी होस्ट करताना दिसणार आहे. बिग बॉस ओटीटी केवळ सहा आठवडे सुरु राहणार असून बिग बॉस ओटीटीचे प्रिमियर 8 ऑगस्ट रोजी वूटवर होणार आहे. प्रथमच चाहत्यांना बिग बॉसच्या घरातील ड्रामा 24 तास लाईव्ह पाहता येणार आहे. यंदा चाहत्यांना एक्स्ल्युझिव्ह कट्स, चोवीस तासांच्या कंटेंट ड्राप्स आणि पूर्णपणे इंटरेक्टिव्ह सेशन पाहता येणार आहे.
करण फक्त बिग बॉस ओटीटी होस्ट करणार आहे. त्यानंतर बिग बॉस 15 सीझन सुरु होणार असून ते सलमान खान स्वतः रिलीज करणार आहे. बिग बॉस 15 कलर्स आणि वूटवर ऑन एअर जाणार आहे.
बिग बॉस ओटीटीच्या होस्टमुळे करण जोहरने आनंद व्यक्त केला आहे. यावेळी करण म्हणाला की, मी आणि माझी आई बिग बॉसचे खूप मोठे फॅन असून आम्ही बिग बॉस आतापर्यंत एका दिवसासाठीही मिस केलेले नाही. बिग बॉस ओटीटीमध्ये खूप जास्त ड्रामा असणार आहे. मला आशा आहे की, मी प्रेक्षक आणि मित्रांच्या अपेक्षांवर खरा उतरेल.