टोकियो ऑलिम्पिक : बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टोकियो ऑलिम्पिक : बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

टोकियो ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने पदकाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा २१-, २१-१० असा दारूण पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. केवळ २९ मिनिटांत सिंधूने पोलिकार्पोवाला पराभवाची धूळ चाखली. आता बुधवारी सिंधू हाँगकाँगच्या चेऊंगशी सामना करणार आहे.
पीव्ही सिंधू ग्रुप जे मधून खेळत असून यावेळी इस्त्रायलची पोलिकार्पोवा आणि हाँगकाँगची चेऊंग या प्रतिस्पर्धी आहेत. ग्रुपमध्ये सिंधू सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. सुरुवातीला धीम्या गतीने खेळणाऱ्या सिंधूने नंतर मात्र वेग पकडला. दोन्ही गेम्स सहज जिंकत सिंधूने आपल्यातील क्रीडा कौशल्य दाखवून दिले आहे. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग १२ पॉइंट्स मिळवत १७- अशी आघाडी घेतली होती. पहिला गेम २१- ने जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने वर्चस्व कायम ठेवत २१-१० ने विजयाची नोंद केली आणि २९ मिनिटांत सामना पूर्ण केला. दरम्यान इस्त्राईलची खेळाडू जखमी झाली आणि त्याचाच फायदा सिंधूला झाला.