बिग बॉस घरात रंगली कवितांची मैफिल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बिग बॉस घरात रंगली कवितांची मैफिल

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ची दणक्यात सुरवात झाली आहे. हा शो छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. या शो ला सुरू होऊन दोनच दिवस झाले असले तरी हा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतं आहे. यात स्पर्धक एकीकडे वाद तर दुसरीकडे दंगा मस्ती करताना पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या कालच्या भागात घरी गप्पांची मैफिल रंगली होती.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवसाची सुरूवात नेहमी प्रमाणे गाण्याने झाली घरात उपस्थित असलेले सर्व स्पर्धक गाण्याच्या तालावर नाचताना दिसले. नंतर बेडरुममध्ये सगळे जण गप्पा मारत असताना अभिनेता आविष्कार दारव्हेकरने एक सुंदर कविता ऐकवली. ही कविता ऐकल्यावर त्याच खोलीत उपस्थित असलेली स्नेहा वाघची रिएक्शन बघण्या सारखी होती. कलर्स मराठी वाहिनीने ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केली असून ती व्हायरल झाली आहे. या पोस्टला आविष्कार कवितेतून घालू पाहतोय साद, पण त्याच्या कवितेला कोणाची हवीय दाद? पाहा”, असे कॅप्शन दिले आहे.