अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाच्या नावावर करणी सेनेचा आक्षेप

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाच्या नावावर करणी सेनेचा आक्षेप

बॉलिवूडमधील अनेक सिमेमांना आजवर करणी सेनेने विरोध दर्शवला आहे. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमधी खिलाडी कुमारच्या सिनेमाला करणी सेनेने विरोध केलाय. अक्षय कुमारच्यापृथ्वीराजया आगामी सिनेमावर करणी सेनेने आक्षेप नोंदवला आहे. सिनेमाच्या नावावरून करणी सेना आता विरोध करू लागली आहे. करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुरजीत सिंह राठोड यांनी सिनेमाच्या नावात बदल करण्याची मागणी केलीय. “जर सिनेमा महान राज्यकर्ता पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे तर सिनेमाच्या नावातही त्यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला जावा आणि त्यांचा आदर करण्यात यावा.” असं सुरजीत सिंह म्हणाले आहेत.

एवढंच नाही तर करणी सेनेने इतरही काही मागण्या केल्या आहेत. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी करणी सेनेसाठी सिनेमाचं स्क्रीनिंग करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलीय. “जर त्यांनी आमचा सल्ला मानला नाही तर वाईट परिणामांचा सामना करावा लागेल. ‘पद्मावतसिनेमावेळी संजय लिला भन्साळी यांच्या सोबत काय झालं हे ध्यानात ठेवावं. या सिनेमाच्या निर्मात्यांना देखील मग यासाठी तयार रहावं लागेल. ” असा इशारा सुरजीत सिंह यांनी दिलाय.