टाळेबंदीच्या काळात सर्व कारभार रामभरोसे सुरू असल्याचा आरोप

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टाळेबंदीच्या काळात सर्व कारभार रामभरोसे सुरू असल्याचा आरोप

कारभार राम भरोसे सुरु असल्याचा आरोप करण्यात आला असून कोरोनाच्या नावाखाली सुरु असलेली अनागोंदी थांबविण्यासाठी कायदाशाही राबविण्याची मागणी पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.
             कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना उपचारासाठी बेड, ऑक्सिजन आवश्यक औषधे मिळत नाही. लसीकरणाचा देखील फज्जा उडाला आहे. कोरोनाच्या संकटकाळात राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप वाढला असून, ते स्वत:चे असतित्व सिध्द करण्यासाठी आवश्यक गोष्टी आरक्षित करत आहे. सर्व सामान्य नागरिकांना दाद दिली जात नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश् निर्माण झाला आहे. भांडण, चोर्या, मारामारी यामध्ये वाढ झाली असून, अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक कायदा हातात घेत आहे.स्वत:चे हित साधण्यासाठी धनदांडगे व्यक्ती देखील मस्तवालपणे वागत आहे.कायदा सुव्यवस्थेचा प्रश् ऐरणीवर आला असताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्या साठी कायदा शाही राबविण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.