‘सिटाडेल’च्या शूटिंगवेळी प्रियांका चोप्राला दुखापत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘सिटाडेल’च्या शूटिंगवेळी प्रियांका चोप्राला दुखापत

हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांची पसंती मिळलेली देशी गर्ल प्रियांका चोप्रा सध्यासिटाडेलया तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगवेळी प्रियांकाला दुखापती झाली आहे. प्रियांकाने फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांनी दिली. हे फोटो पाहून अनेक चाहते हैराण झाले आहेत.

प्रियांका चोप्राने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इन्स्टास्टोरीला दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाच्या कपाळावर जखमा झाल्या असून तिचं कपाळ रक्ताने माखलेलं दिसतंय. पहिला फोटो शेअर करतकाय खरं आणि काय खोटंअसं कॅप्शन तिने दिलंय. तर दुसऱ्या फोटोत प्रियांकाने भुवयांमध्ये झालेली जखम खरी असल्याचं म्हंटलंय. तर कपाळावरी जखम ही खोटी असल्याचं सांगितलंय. प्रियांका चोप्रा या वर्षाच्या सुरुवातीपासूनच लंडनमध्येसिटाडेलया सिनेमाचं शूटिंग करतेय. या सिनेमात प्रियांका एका गुप्तहेराची भूमिका साकारतेय. या सिनेमात ती  रिचर्ड मॅडन आणि पेड्रो लिएंड्रोसोबत झळकणार आहे. या सिनेमापूर्वीच प्रियांकानेटेक्स्ट फॉर यूसिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.