राज्यांना 42.15 कोटींपेक्षा अधिक लसी वितरीत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यांना 42.15 कोटींपेक्षा अधिक लसी वितरीत

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आतापर्यंत राज्य- केंद्रशासित प्रदेशांना 42.15 कोटींपेक्षा अधिक 42,15,43,730 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यापैकी, वाया गेलेल्या लसींच्या मात्रांसहएकूण 39,55,31,378 मात्रांचा वापर करण्यात आला आहे. ( सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार)राज्य-केंद्रशासित प्रदेशांसह खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 2.60 कोटींपेक्षा जास्त 2,60,12,352 लसींच्या मात्रा शिल्लक आहेत. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत कोविड लसी पुरवत आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोविड सार्वत्रिक लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 21 जून रोजी सुरु झाला आहे.
लसींची अधिक उपलब्धता, उपलब्ध होणाऱ्या लसींच्या साठ्याविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगावू सूचना देऊन, त्याद्वारे लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करण्याचा प्रयत्न, यातून लसीकरण मोहीमेला गती देण्यात आली आहे.