लोकांचे जीव वाचवण्यासाठी दुसरं इंजेक्शन नाही का ?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लोकांचे जीव वाचवण्यासाठी दुसरं इंजेक्शन नाही का ?

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद करोना काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी ‘मसीहा’ बनून धडपड
करताना दिसून येतोय. तो जे जे काम करतोय त्याबाबतची प्रत्येक अपडेट तो स्वतः त्याच्या
सोशल मीडिया अकाउंटवरून नेहमीच देत असतो. नुकतंच त्याने शेअर केलेल्या एका ट्विटने
सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.
अभिनेता सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत डॉक्टरांना सवाल केलाय. या
ट्विटमध्ये सोनूने लिहिलंय, “एक साधा प्रश्न आहे…जर आपल्या सर्वांना हे माहितेय की एक
खास इंजेक्शन कुठेच उपलब्ध होत नाही तर मग प्रत्येक डॉक्टर्स लोकांना हेच इंजेक्शन
लावण्याचा सल्ला का देत आहेत ? जर रूग्णालयांना हे इंजेक्शन मिळत नाहीत तर मग सामान्य
जनता कुठून आणेल हे इंजेक्शन ? लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपण दुसऱ्या इंजेक्शनचा वापर
का नाही करू शकत ?” या ट्विटमध्ये अभिनेता सोनूने जरी इंजेक्शनचं नाव नमूद केलं नसलं
तर त्याचा इशारा हा थेट रेमडेसिवीर इंजेक्शनवरच होता. सोनूने शेअर केलेलं हे ट्विट काही

मिनीटांतच अगदी वाऱ्यासारखा पसरलाय. नेटकऱ्यांनी त्याच्या या ट्विटवर आपल्या प्रतिक्रिया
देत रिट्विट केलंय.
काही दिवसांपुर्वीच दिल्लीमधल्या एका रूग्णालयात एका करोनाविरोधात झुंज देणाऱ्या एका
मुलीचं निधन झाल्यानंतर अतिशय दुःखी झाला होता. या मुलीचा रूग्णालयात असतानाचा
व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये बेडवर ही मुलगी ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातील
‘लव्ह यू जिंदगी’चं गाणं ऐकून रमताना दिसून आली. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण तिच्या
धैर्याला सलाम करीत होता. याच मुलीची करोनाविरोधातली झुंज अपयशी ठरली आणि तिचं
निधन झालं. याबाबतची माहिती तिथल्या रूग्णालयातील डॉक्टर मोनिका लंगेह यांनी दिली.