एका गाण्यासाठी ऐवढे पैसे, फी ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एका गाण्यासाठी ऐवढे पैसे, फी ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नोरा फतेहीने आज भारतात आपलं नाव कमावलं आहे. नोरा तिच्या आयटम साँग्समुळे बरीच प्रसिद्ध आहे. नोराचा जन्म कॅनडामध्ये झाला. जिथे तिची स्टाईल पाहताच तिच्या चाहत्यांना वेड लागत. नोराने हार्डि संधूच्या 'क्या बात है' या गाण्यातून इंडस्ट्रीमध्ये आपली जोरदार एन्ट्री घेतली.

या गाण्यात नोराची कामगिरी पाहून प्रत्येकजण तिच्यावर फिदा झाला.अभिनेत्रीचं हे गाणं हिट ठरताच ती टी-सिरीजच्या अनेक गाण्यांमध्ये दिसू लागली. नोराला बर्याच वेळा सर्वोत्कृष्ट डान्सरचा पुरस्कारही मिळाला आहे. तर जाणून घेऊया बॉलिवूडमध्ये काम करत असताना नोराची नेटवर्थ किती आहे आणि ती किती पैसे कमवते.

एका गाण्यात काम करण्यासाठी नोरा फतेही 40 लाख रुपये घेते. हि फि बॉलिवूड आणि पंजाब इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही मॉडेलपेक्षा जास्त आहे. इतकंच नाही तर नोराचं 'गर्मी' गाणं सोशल मीडियावर हिट झालं. यानंतर नोराने आपली फी वाढवली होती. सोशल मीडियावर ब्रँडची जाहिरात करण्यासाठी नोरा 5 लाख रुपये घेते. एवढ्या कमी कालावधीत नोराने बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत वरुण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कर आणि जॉन अब्राहमसह काम केलं आहे.

नोराचं नेटवर्थ
नोरा आज बॉलिवूडची सर्वाधिक डिमांडमध्ये असणारी अभिनेत्री बनली आहे. ज्यामुळे तिला सतत बरीच कामं मिळतात. नोराची एकूण संपत्ती जवळपास दीड दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. जर आपण रुपयांमध्ये पाहायला गेलो तर ही रक्कम 12 कोटी ईतकी आहे. नोरा दरवर्षी 2 कोटी रुपये कमवते. नुकतच नोराने एका चित्रपटाचं चित्रीकरणही केलं आहे.