रत्नागिरीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, राजापूर शहरातील बाजारपेठेत शिरले पाणी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रत्नागिरीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, राजापूर शहरातील बाजारपेठेत शिरले पाणी

रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर धरला असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी भरले आहे. साधारण तीन फुटापर्यंत हे पाणी असण्याची शक्यता आहे. राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेने देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चौकात पाणी आल्याने आता व्यापाऱ्यांनी आपल्या सामानाची हलवाहलव करत ते सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरूवात केली आहे. इतकेच नाहीतर नगराध्यक्ष जमीर खलीफे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली असल्याचीही माहिती आहे. खरंतर, राजापूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहेयामुळे संपूर्ण शहरात पाणी घुसलं आहे. शहरात पूर पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर इथल्या मुंबई-गोवा महामार्गवर ब्रिटिशकालीन ब्रिजवर राजापूर तहसिलदार प्रतिभा वराळे, मुख्यधिकारी देवांनंद ढेकळे, नगराध्यक्ष जमिर खलिपे, स्थानिक नगरसेवक सुभाष बंड्या बाकाळकर, राजापूरचे तलाठी कोकरे यांनी वाढत्या पाण्याची पाहणी केली. जर अर्जुना नदीचे पाण्याची पातळी वाढली तर मुंबई-गोवा महामार्ग हा अवजड वाहतूकीसाठी बंद केला जाईल अशीही माहिती देण्यात आली आहे. अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.