KRK ने घेतला शेरणी सोबत पंगा!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

KRK ने घेतला शेरणी सोबत पंगा!

बॉलिवूड अभिनेता कमाल आर. खान नेहमीच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. काही
दिवसांपूर्वी KRK ने बॉलीवूडची क्वीन कंगना रौणातसोबत पंगा घेतला होता. तेवढ्यात आता KRK ने
अभिनेत्री विद्या बालनवर टीका करत निशाणा साधला आहे.
विद्या बालनचा शेरनी हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. विद्या बालनचा हा छोटा चित्रपट असून
त्यावर रिव्ह्यू देणार नाही, असे वक्तव्य KRK ने केले आहे. या दरम्यान सोशल मीडियावर युजर्स आता
KRK ला ट्रोल करत आहेत.
KRK ने ट्वीट करत म्हटले की, 'बरेच लोक मला म्हणाले की, शेरनी या चित्रपटाचा रिव्ह्यू करा, पण मी
छोटे चित्रपट पाहत नाही आणि त्याच्यावर रिव्ह्यू करतं नाही किंवा अशा चित्रपटांवर चर्चाही करत
नाही. कारण मी द ब्रँड KRK जगातील नंबर १चा चित्रपट समीक्षक आहे', असे ट्वीट KRK ने केले आहे.
यावर आता विद्या बालन काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.