जम्मू-काश्मीर : भाजप नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जम्मू-काश्मीर : भाजप नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्याच्या घरावर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला आहे. राजौरी जिल्ह्यातील खांडलीमध्ये भाजप नेते जसबीर सिंग यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या 4 वर्षीय पुतण्याचा मृत्यू झाला आहे. तर, 7 जण जखमी झाले आहेत.
यासंदर्भात जम्मूच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार भाजप नेते जसबीर सिंग यांचे कुटुंबीय टेरेसवर असताना काही अज्ञातांनी ग्रेनेड हल्ला केला. पीपल्स अँटी-फॅसिस्ट फ्रंटने या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याबद्दल एजन्सींकडून अथिक तपास सुरू आहे. जसबीर सिंग यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राजौरीमध्ये मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या 9 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील लाल चौकात दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात गुलाम रसूल डार आणि जव्हारा बानो या दाम्पत्याचा मृत्यू झाला. गुलाम रसूल डार हे कुलगामचे भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि रेडवीनी बाला इथले सरपंच होते. गुलाम रसूल डार यांनी गेल्यावर्षी जिल्हा विकास परिषदेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
दरम्यान, जम्मू -काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात बीएसएफच्या ताफ्यावर गोळीबार झाल्यानंतर गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये पुन्हा चकमक झाली. या चकमकीत दोन सुरक्षा रक्षकासह चार जण जखमी झाले. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कुलगाममधील काझीगुंड परिसरातील मालपोरा येथे दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर गोळीबार केला होता.