क्रोएशिया विरुद्ध स्पेन सामना; स्वित्झर्लंडसमोर फ्रान्सचं आव्हान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

क्रोएशिया विरुद्ध स्पेन सामना; स्वित्झर्लंडसमोर फ्रान्सचं आव्हान

यूरो कप २०२० स्पर्धेत गतविजेता पोर्तुगाल संघ बाहेर गेल्याने आता कोणता संघ अंतिम फेरी गाठणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या बाद फेरीचे सामने सुरु असून बेल्जियम, इटली, चेक रिपब्लिक, डेन्मार्क या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आज बाद फेरीत क्रोएशिया विरुद्ध स्पेन आणि स्वित्झर्लंड विरुद्ध फ्रान्स असे सामने असणार आहेत. त्यामुळे या दोन सामन्यातून कोणता संघ उपांत्यपूर्व फेरीत धडक मारतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

क्रोएशिया विरुद्ध स्पेन

क्रोएशिया संघाची बाद फेरीत वर्णी गुण सरासरीमुळे लागली आहे. क्रोएशियाला साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पराभूत केलं होतं. इंग्लंडकडून - ने पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर चेक रिपब्लिक विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता. तर तिसऱ्या सामन्यात स्कॉटलँडचा - ने धुव्वा उडवत बाद फेरीत धडक मारली होती. दुसरीकडे स्पेननं साखळी फेरीत एकही सामना गमवला नाही. दोन सामने बरोबरीत सुटले. तर एका सामन्यात विजय मिळवला. स्वीडनविरुद्धचा सामना -, पोलंडविरुद्धचा सामना - ने बरोबरीत सुटला. तर स्लोवाकियाला - ने पराभूत करत बाद फेरीत धडक मारली. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून कोणता संघ उपांत्यपूर्व फेरीत धडक मारतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.