२०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसाठी दावेदारी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

२०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसाठी दावेदारी

लॉस एंजेलिस येथे २०२८ला होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रि के टचा समावेश करण्यासाठी दावेदारी करण्यात येणार असल्याचे मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) निश्चित केले. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठीआयसीसीने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे. स्वायत्त संघटनेचा दर्जा गमावून भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिपत्याखाली जाण्याच्या भीतीने आतापर्यंत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) ऑलिम्पिकला विरोध केला होता. पणबीसीसीआयने या अभियानाला पाठिंबा दर्शवल्याचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. २०२८च्या ऑलिम्पिकचे उद्दिष्ट समोर ठेवूनआयसीसीने ऑलिम्पिक कार्यकारी गटसुद्धा नेमला आहे.

‘‘क्रिकेटच्या प्रदीर्घ भविष्यासाठी ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये त्याच्या समावेशाची नितांत आवश्यकता आहे. जगभरात क्रिकेटचे अब्जावधी चाहते असून, या सर्वाना क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावे, असे वाटते आहे,’’ असेआयसीसीचे कार्याध्यक्ष ग्रेग बारक्ले यांनी सांगितले. १९९८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत क्रिकेटचा प्रथमच समावेश करण्यात आला होता. त्याशिवाय २०२२च्या बर्मिगहॅम राष्ट्रकुलमध्ये महिला क्रिकेटचाही समवेश करण्यात आला आहे.