उपमुख्यमंत्री आम्हाला साथ देत नाहीत; यशोमती ठाकूर यांचा आरोप

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

उपमुख्यमंत्री आम्हाला साथ देत नाहीत; यशोमती ठाकूर यांचा आरोप

अकोला: उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला पाहिजे तशी साथ देत नसल्याचा गंभीर आरोप महिला बालकल्याण मंत्री काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. अकोल्यातील बाळापूर येथील हॉटेल मराठा येथे आयोजित अन्याय ग्रस्त शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. बाल संगोपनाचे पूर्वी 450 रुपये मिळायचे ते आम्ही 1125 रुपये केले,आणि आता 2500 साठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कडे पाठविला असून उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तशी साथ देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर सुद्धा निशाणा साधला आहे. केंद्र सरकार हे हिंदू विरोधी सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.